Tuesday, January 8, 2013

तुटले

तुटले

संदीप खरेंची "काळेभोर डोळे" नावाची कविता आणि संदीप-सलील यांच्या “आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे (तुटले)” ह्या प्रसिद्ध गाण्याचे मी केलेले विडंबन

मूळ कविता आणि चाल इतकी सुंदर आहे की मला फार काही करायची गरज पडली नाही :)


मूळ कविता...

http://sandeepkharekavitangaani.blogspot.in/2010/02/blog-post_03.html



तुटले

(ही कविता आहे मंदगती प्रोसेसर, कूर्मगती कनेक्शनस आणि त्यामुळे झालेल्या गोंधळावर)


"आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...
बाकी सारे आवाज, चित्कार..

बाकी सारे आवाज, चित्कार, प्रकाश, अंधार
मागे पडत चाललेल्या बिलांसारखे मागे जात जात फाटत चाललेत
डीलीट करावेत आकडे हजार आणि भरावेत पुन्हा हजार
तसा प्रोटोकॉल
त्याच्या पाठीमागे
बंद झालेले निळेशार पडदे
सुन्न झालेल्या प्रोग्राम्सची यादी
काळे पांढरे धुळीचे पुंजके
आणि पायात गुंतलेल्या वायरींचे अखंड जाळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"फॉर्म जसे मी पैसे देऊन भरले
अन खिशावर ओझे नवे अवतरले
महिन्याच्या आत एका क्षणात
लोहबंध ते विस्कटले"

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

विसरत चाललोय दर आठवड्याला येणाऱ्या इंजीनीयरचे नाव
विसरत चाललोय एक्स्चेंजचे हेलपाटे, सुट्टीसाठी रोजचे बहाणे
वा CPU च्या मागे नेमक्या भागावर घातलेली लाथ
ती लाथ तर केव्हाच बसली, मास्तरांच्या छडीसारखी
सर्वर मात्र अजूनही तिथेच,
पण त्याचीही PACKETS  किमान चारदातारी त्याच ADRESS वरून फिरून परत आलेली
आता तर वायारीच नाही मोडेम सुद्धा नवे आहे कदाचित
पण तरीही माझ्याच नावाने बोंबलतायत सगळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"क्षण तुटणार्या भेटींचे
अन थकलेल्या बोटांचे
ते खरेच Audibles सारे
वा Offline भासांचे
थकलेत हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले "

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

तुझ्याकडे माझी "डाऊनलोडिंग" असे दिसणारी एक फाईल
मी ही हट्टी
माझ्याकडे तुझी "टायपिंग" असे दिसणारी एक राखाडी खिडकी
Archieve केलेले काही मेसेज काही voicemails अजूनही
थोडसं chatting बरचसं ping अजूनही
बाकी invisible होऊन गेलो आहोत
तुझ्या लिस्ट वर असलेला मी, माझ्या लिस्ट वर असलेली तू
आणि आपल्याशी conference करणारे ते सगळे
आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

"महिना अखेरीस तेव्हा डोक्याची झाली माती
नव्हताच बिलांचा दोष, कंपनीच फसवी होती
फसवेच स्पीड, फसवेच plan
हे LAN सदा गुरफटलेले"

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

Patience संपू शकतात, problems संपत नाहीत
नाती तुटू शकतात, connections जुळत नाहीत
history मधली पेजेस डीलीट होत जातात
लिस्ट मधले फ्रेंड्स idle होत जातात
Inbox मधले forwards दुर्मिळ होत जातात
कॉम्पवरचे वायरस ही नकळत विरळ होत जातात
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला या कवितांना   
कागद ऐवजी ब्लॉग वर खरडलेल्या चारोळ्यांना
विसरत चालल्या आहेत password न बदलता बदलेल्या वाटा
विसरत चालले आहे रात्री तीनचे ठोके देणारे घड्याळ
आणि विसरत चालले आहेत ट्यूब बंद केल्यावरही लकाकणारे डोळे

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

मी favourites केलेया sites वेड्यागत अजुनी बघतो
तुटलेली दाबत बटणे की-बोर्ड वर खद खडखड करतो
गुंतून स्वप्न अंतास सत्य हे आज मला उलगडले

तुटले..ए ए ए... तुटले..ए ए ए...

आता आठवतायत ते फक्त हिरवे हिरवे दिवे...

- साभार समाप्त

No comments: