खरं सांग..
कल्पनेतून उतरणारे,
रोज झरझर पानावर येणारे,
शब्द आता माझ्या बोटांवर अडलेत जसे,
रोज झरझर पानावर येणारे,
शब्द आता माझ्या बोटांवर अडलेत जसे,
गळ्यातून निघणारे,
अलगद मैफिलीत शिरणारे,
सूर तुझ्याही ओठांवर तसेच अवघडलेत ना..
अलगद मैफिलीत शिरणारे,
सूर तुझ्याही ओठांवर तसेच अवघडलेत ना..
अचानक भर दुपारी,
ह्र्दयात आज माझ्या,
आठवणींचे आभाळ भरून आलंय तेव्हा,
ह्र्दयात आज माझ्या,
आठवणींचे आभाळ भरून आलंय तेव्हा,
पावसाचे पाणी थोडं,
पापण्यांच्या काठावरुन,
पापण्यांच्या काठावरुन,
गालांवर तुझ्याही ओघळले असेल ना..
वार्यामागे धावताना,
नव्या वाटा चोखाळताना,
पाऊल माझं जड झालंय तसं,
तेव्हा वरवर गोड हसताना,
हात हलवून निरोप देताना,
मन तुझंही ओशाळलं होतं ना..
एक एक स्वप्न
अजुनही माझ्या आयुष्याचे,
तुझ्यातच गुंतलय तसं..
सांगितलं नाहीस मला जरी,
मन तुझंही ह्ळूच
तुझं न ऐकता कधीतरी
माझ्याकडे धावलं असेल ना..