उठ मराठ्या उठ,
बसून रहाणं हा आपला धर्म नाही
आपला धर्म जाणून घ्यायचा असेल
तर उठ, चालायला लाग
महाराष्ट्राचा डोंगरमाळ खुणावतोय तूला,
अंग पोळणार्या उन्हाची तमा बाळगू नकोस
जंगलाच्या भयाण अंधाराला भीक घालू नकोस
समोरचा कडा छाती दड्पून टाकेल
पावसाचा मारा अंगावर शहारा आणेल
घसा कोर्डा पडेल, घामाने अंग भिजेल
पाय घसरतील कधी,कधी़ तोल सुटेल,
सांभाळ पडू नकोस आणि पडल्यावर रडू नकोस,
ह्स स्वत:लाच थोडं, अंगावरची धूळ झटक,
हात द्यायला कोणी नसेल, उठ एकटाच
पुन्हा जोमाने चढायला लाग, वर पोचायचय तूला
चालत राहीलास तर शेवटी नक्की पोचशील
मग वर पोचल्यावर टाक्याच्या थंड पाण्याने तहान भागव
आणि डोळे मिटून महादेवाचे आभार मान
मग मागे वळून खाली वाकून बघ
तुला कळेल सह्याद्रीपुढे तू किती लहान आहेस ते
गुडघे टेकतील तुझे आपोआपच त्याच्यापुढे
तो समजावेल मग तूला आपला धर्म...
"मावळ्चया खोर्यात दौडणार्यांचा
घोड्याच्या पाठीवर वार्याशी शर्यत करणयाचा वंश आहे आपला
तलवारीच्या टोकावर शिर ठेवणार्यांचा्
आणि मातीला मातेसमान मानण्याचा धर्म आहे आपला
पाखराने उडायला कचरायचं नसतं
उलटं आपले पंख पसरून आभाळालाच ललकारायचं असतं
मराठ्याने काळाला कधीच घाबरायचं नसतं
स्वाभिमानासाठी आणि सह्याद्रीसाठी...नेहमीच लढायचं असतं स्वाभिमानासाठी आणि सह्याद्रीसाठी...नेहमीच लढायचं असतं"