कोपरयातलं एक टेबल, त्यासमोर मांडलेल्या खुर्च्या
दोन स्ट्रॉ घातलेली एक मँगोलाची बाटली आणि त्याकडे एकटक पाहणारी तू
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे
स्टेशनवरचं घड्याळ, पुलाखालची नेहमीची ठरलेली भेटण्याची जागा
एक थ्रू-ट्रेन धडाडत जाणारी आणि तू दचकून धरलेला माझा हात
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे
वळणावरचा रिकामा बसस्टाँप, त्यावर डवरलेलं सोनमोहोराचं झाड
आणि अचानक आलेल्या वाऱ्याने आपल्यावर केलेली पिवळ्या फुलांची पखरण
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे
शेवटच्या क्षणी मिळवलेले कॉन्सर्टचे पास, रांगेत झालेली चुकामुक
आणि त्या काळोखातही मला बरोबर शोधणारी तुझी नजर
माझ्याकडे अजून सारं काही तसंच आहे
जुन्या वहीच्या कव्हरात जपून ठेवलेले फोटो, आठवणींचे किस्से
शुल्लक भांडणाची कारणं आणि मग कॉफीसोबत न संपणारी स्पष्टीकरणं