तू, कधीतरी तुझं अचानक दिसणं
अन कधी शोधुनही कुठेच नसणं
जागा असताना होणारे भास की
मिटल्या डोळयांनी पाहिलेलं स्व्प्न
हसणं तुझं, कधी उगाचंच चिडणं
आणि या साऱ्याला माझं नेहमीच फसणं
आठवणी तुझ्या, कधी जवळ असणं
माझं आयुष्य हे असं माझंच नसणं
तासनतास वाटेकडे तुझ्या डोळे लावून बसणं
तुला समोर पाहिल्यावर मात्र मी सगळंच विसरणं
तू निघून गेल्यावर पुन्हा तुझ्याच विचारांत हरवणं
आणि वेळ लगेच निघून जातो म्हणून स्वत:शीच हळहळणं
थोडा गोंधळलेलं, कधी अवघडल्यासारखं
कधी कळून उगाचंच, न कळल्यासारखं वाटणं
एकटीच पुन्हा माझी रात्र, दिवसाची पाटी आजही कोरीच
सोपी तुझी सारीच उत्तर, कठीण फ़क्त माझेच प्रश्न