काल एक ढग होतो मी, आज एक छोटासा थेंब आहे
उद्या मातीत मिसळून जाईन कदाचित,
पण त्याआधी पाउस होऊन एकदा
तुला नकळत भिजवून जाईन
काल कोरा कागद होतो मी, आज एक ओळ आहे
उद्या रद्दीत हरवून जाईन कदाचित
पण त्याआधी गाणे होऊन एकदा
ओठांवर तुझ्या नाचून जाईन
काल अनोळखी होतो मी आज एक परिचित आहे
उद्या आठवणींत विरून जाईन कदाचित
पण त्याआधी एकदा पहाटेचं स्वप्न होऊन एकदा
डोळ्यांत तुझ्या हरवून जाईन
No comments:
Post a Comment