Sunday, July 5, 2009

एकटेच सारे

हातांतले हात, वाळूतली पावले

डोळ्यात साठलेले, मावळतीचे रंग

फेसाळता सूर्यास्त, लाटांचे फवारे

तुझ्यावाचून...एकटेच सारे


बागेतले बाक, नाचणारी कारंजी,

आईस्क्रीमच्या काडया, भेळीचे कागद

चिवचिवणारे पक्षी, कुरकुरणारे झोपाळे

तुझ्यावाचून...एकटेच सारे


पाचूचे डोंगर, थेंबांचे मोती

रातकिड्यांचे गाणे, काजव्यांचे दिवे

धुक्यातल्या वाटा, पावसाचे चिंब वारे

तुझ्यावाचून...एकटेच सारे


आता उरलेत ते फक्त घुटमळणारे श्वास

घड्याळाचे तास, विचारांची भुतं

तहानलेलं मन, वाटेकडे मिटलेले डोळे

आणि आपसुक ओले झालेले पापण्यांचे किनारे

तुझ्यावाचून आता एकटेच सारे

No comments: