आता उधळलेल्या काड्या वेचताना
वेड्यासारखं आत कुठेतरी वाटत राहतं
यंदाच्या पावसाआधी तर
घरटं सारं एकसंध होतं...
मग एकएक तुकडे शोधून
जोडताना माझं मलाच पटतं
लोक सांगतात तसं कदाचित
हृदय खरंच काचेचं असतं
कसं असतं बघ ना..
न सांगता निघून जातं,
तेव्हा कळतं कोणीतरी आपलंही होतं
पण काही वेळा खरं सांगण्यापेक्षा
तुझं नुसतं "नको" एवढंच सोपं उत्तर असतं
दुरून बाटलीत भरलेलं पाणी वाटतं
फुटून सांडतं तेव्हा कळतं अत्तर होतं
हुंदक्याच ओझं नकोसं होतं,
तेव्हा जाणवतं..आपल्याला मनही होतं
तेव्हा जाणवतं..आपल्याला मनही होतं
कसं असतं बघ ना..
तुझ्यापुढे भविष्य असतं, लाख प्रश्न असतात
संसार असतो, समाज असतो
आणि माझ्याकडे....
माझ्याकडे फक्त माझा नाईलाज असतो
कसं असतं बघ ना..
No comments:
Post a Comment